Rajinikanth – थलायवा उर्फ रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
‘थलायवर 170′ (Thalaivar 170) असं या चित्रपटाचं नाव असून, सिनेमात थलायवा सोबत महानायक अमिताभ बच्चन देखील झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
वयाच्या 72 व्या वर्षी देखील रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता तर एका चाहत्याने रजनीकांत यांचं मंदिर उभारलं आहे. रजनीकांत यांचा चाहता कार्तिक याने तामिळनाडू याठिकाणी आपल्या लाडक्या अभिनेत्याचं मंदिर उभारलं आहे.
मंदिरात चाहत्याने तब्बव 250 किलोग्रॉमची रजनीकांत यांची मुर्ती तयार केली आहे. सध्या रजनीकांत यांच्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. थलायवा यांच्या मंदिरात पूजा अर्चा आणि होम हवनही करण्यात येत. पारंपरिक पद्धतीत मंदिरात रजनीकांत यांची पूजा करण्यात येते.