जम्मू – बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात सीमा रस्ते (Border Road) संघटनेने जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ गुहेपर्यंत रस्ता (Amarnath Cave Road) जोडणीचा विस्तार केला आहे. सोमवारी प्रथमच अमरनाथ गुहेपर्यंत (Amarnath Cave) वाहने पोहोचली. बीआरओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालटाल बेस कॅम्पमार्गे (Balatal baise camp) डोमेल ते अमरनाथ गुहेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे.
बीआरओच्या सैन्याने कठीण काम पूर्ण केले आणि अमरनाथ गुहेच्या मंदिरापर्यंत रस्ता संपर्क वाढवून इतिहास रचला. वाहनांची पहिली तुकडीही मंदिरात पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांच्या देखभालीची जबाबदारी गेल्या वर्षी बीआरओकडे सोपवण्यात आली होती. बीआरओचा ‘प्रोजेक्ट बीकन’ अमरनाथ यात्रा ट्रॅकच्या जीर्णोद्धार आणि सुधारणेमध्ये गुंतलेला आहे.
यापूर्वी, जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग गंदरबल जिल्ह्यातील बालटाल रस्त्याची देखभाल करत होता आणि पहलगाम विकास प्राधिकरण अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम रस्त्याची देखभाल करत होता. केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा ट्रॅक बीआरओकडे देखभाल आणि अपग्रेडेशनसाठी सुपूर्द केला होता. पारंपारिकपणे गुहेच्या मंदिरात पायी जावे लागलेल्या यात्रेकरूंच्या अडचणी कमी करण्यासाठी बीआरओने रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला.
भाजपचे जम्मू-काश्मीर प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बाबा अमरनाथ मंदिरावर लाखो लोकांची श्रद्धा आहे. रस्त्यावरील त्रुटी दाखवून पीडीपी 2008 च्या जमिनीच्या वादाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु लोक पुरेसे शहाणे आहेत आणि पुन्हा फसवणुकीच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत.
हा इतिहास नाही, हा हिंदू धर्म आणि त्याच्या निसर्गावरील विश्वासाविरुद्धचा सर्वात मोठा गुन्हा आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी धार्मिक तीर्थक्षेत्रांचे पिकनिक स्थळांमध्ये रूपांतर करणे निषेधार्ह आहे. यातून अमरनाथ यात्रेमधील साहस आणि अनिश्चिततेमधील थरार संपवण्यात आला आहे. तसेच गुंफेतील धार्मिक पावित्र्यही आता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं स्पष्ट मत पीडीपीचे प्रवक्ते मोहित भान यांनी व्यक्त केलं आहे.