Gautam Gambhir On Angelo Mathews : बांगलादेशविरुद्ध अँजेलो मॅथ्यूजला ज्या पद्धतीने बाद करण्यात आले त्यावरून गदारोळ थांबत नाही आहे. वास्तविक, श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट घोषित करण्यात आले.
मात्र, आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने ट्विट करून लिहिले, ‘सोमवारी बांगलादेश विरूध्द श्रीलंका सामन्यादरम्यान दिल्लीत जे काही घडले ते निराशाजनक आहे.’ गौतम गंभीरशिवाय अनेक दिग्गजांनी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनवर टीका केली आहे.
गौतम गंभीर, उस्मान ख्वाजा आणि मायकेल वॉन यांसारख्या दिग्गजांच म्हणणं आहे की, बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन खेळाच्या भावनेविरुद्ध वागला आणि ते क्रिकेटसाठी चांगले नाही.
अँजेलो मॅथ्यूज सोशल मीडियावर सध्या सतत ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून अँजेलो मॅथ्यूजच्या TIME OUT प्रकाराबात आपला फीडबॅक देत आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजा लिहितो की, अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर आला नसता तर मी पूर्णपणे टाईम आऊटच्या बाजूने आहे पण काल जे काही घडलं, हे हास्यास्पद आहे.
याशिवाय इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने लिहिले की, ‘हेल्मेटच्या समस्येमुळे वेळ संपला… हा एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आहे.’