Earthquake : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. आपत्तीमध्ये, देशाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. इमारती कोसळल्याने आणि दळणवळणाचे दुवे तुटल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
Nepal: Death toll jumps to 70 after strong earthquake
Read @ANI Story | https://t.co/e1TCzfvGr9#NepalEarthquake #earthquake #Nepal pic.twitter.com/xY8BEM2zMS
— ANI Digital (@ani_digital) November 4, 2023
वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम नेपाळमध्ये 128 लोकांचा मृत्यू झाला आणि 140 हून अधिक लोक जखमी झाले. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळशिवाय भारतातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरसह यूपी आणि बिहारमध्ये मध्यरात्री लोक घाबरून घराबाहेर पडले.
#UPDATE | Nepal Earthquake | At least 36 people have been confirmed dead in Rukum West, and the toll is expected to rise further This is the update we have been able to get till 5 AM: Chief District Officer of Rukum West Hari Prasad Pant to ANI
At least 34 have been confirmed… https://t.co/cB18CfiOgy
— ANI (@ANI) November 3, 2023
नेपाळच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ‘भेरी हॉस्पिटल, कोहलपूर मेडिकल कॉलेज, नेपाळगंज मिलिटरी हॉस्पिटल आणि पोलिस हॉस्पिटल भूकंपग्रस्तांसाठी उघडण्यात आले आहेत. नेपाळमधील सर्व हेली-ऑपरेटर्सना स्टँडबायवर राहण्यास सांगण्यात आले आहे आणि बाधित भागातून जखमींना एअरलिफ्टची सुविधा देण्यासाठी नियमित उड्डाण हालचाली स्थगित करण्यात आल्या आहेत. नेपाळगंज विमानतळ आणि लष्करी बॅरेक हेलिपॅडवर प्रत्येकी एक रुग्णवाहिका तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
तत्पूर्वी, गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबर रोजी, नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते.