ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh Match : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 23व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 382 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी 174 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने एकूण 15 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने मुंबईच्या मैदानावर तुफानी खेळी केली. त्याचे शतक हुकले. त्याने 95 धावांची खेळी खेळली.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत डोंगराएवढी धावसंख्या उभारली. 382 धावा करून, दक्षिण आफ्रिकेनं विश्वचषक हंगामात तीन वेळा 350 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली आहे. यासह त्यांनी एका विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. असा करणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ ठरला आहे. या बाबतीत त्यांनी भारतीय संघालाही मागे टाकले आहे.
खरं तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक हंगामात तीनदा 350 धावा करणारा पहिला संघ ठरला. क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विक्रमी कामगिरी केली.
विश्वचषकाच्या इतिहासात आफ्रिकेचा संघ आघाडीवर…
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वाधिक वेळा 350 धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. आतापर्यंत आफ्रिकेच्या संघाने सर्वाधिक 8 वेळा 350 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
1. दक्षिण आफ्रिका 8 वेळा 350 धावा
2. ऑस्ट्रेलिया 7 वेळा 350 धावा
3. भारत 4 वेळा 350 धावा
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 350 धावा करण्याचा विक्रम करण्याच्या यादीत पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानावर आहे. 7 वेळा कांगारू संघाने विश्वचषकादरम्यान 350 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. आयसीसी (ICC) एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 350 धावा केल्याच्या बाबतीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मागे असला तरी, 4 वेळा 350 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर, तरीही ते तिसऱ्या स्थानावर आहे.