मुंबई – ‘बाहुबली’ या चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रभास (Prabhas) एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रभासने त्याचं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहे. हल्ली अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ते याद्वारे माहिती देताना दिसतात. मात्र अशातच आता प्रभासने त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्याने त्याचे चाहते देखील चिंतेत आहे. तर काही जण प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवत आहे. परंतु याबाबत प्रभास किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. सध्या प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य वापरकर्त्यांची खातीही या पद्धतीने गायब झाली आहेत.
प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या प्रभास दिग्दर्शक मारुतीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘प्रोजेक्ट के’ असे होते. प्रभासचे चाहते प्रशांत नीलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘सालार’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘डिंकी’शी टक्कर होणार आहे.