विश्रांतवाडी – पुणे सिव्हिल कोर्ट (शिवाजीनगर) ते तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत व माजी नगरसेविका शितल सावंत यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सावंत यांनी पवार यांच्याबरोबर पुणे शहराच्या पूर्व भागातील विविध प्रश्नांवरही निवेदन देत चर्चा केली.
तिर्थक्षेत्र आळंदी, चाकण एमआयडीसी आदी बाबींचा विचार करता पुणे सिव्हिल कोर्ट ते तीर्थक्षेत्र आळंदी या मार्गावर मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यातून स्थानिक कामगार वर्ग, भाविक व विद्यार्थी यांच्या प्रवास सुखकर होण्यास मदत होईल, असे सावंत यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.