tejaswini pandit – आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj thackeray) पत्रकार परिषद घेऊन टोल नाक्यासंदर्भातील (Toll) आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे.
ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे. टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले चार दिवस उपोषणाला बसले होते.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 8 ऑक्टोबरला राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. यानंतर आवाज स्वतः राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधून या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, या प्रकरणी आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (tejaswini pandit) सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणते, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं?
तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!’ असं ती म्हणाली आहे. सध्या अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.