Entertainment – अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. या टीझरचा एक डायलॉग वादळ निर्माण करत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे, भारताला त्रास दिला तर सोडणार नाही. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या टीझरला लोकांना पसंती मिळत आहे. टीझरमध्ये कंगना रणांगणात गर्जना करण्याच्या तयारीत दिसत आहे.
रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन हाऊस आरएसव्हीपी मूव्हीजच्या बॅनरखाली बनलेल्या कंगनाच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाच्या 1 मिनिट 25 सेकंदाच्या या टीझरमध्ये रिलीज झाला आहे. ‘प्रत्येक वेळी चर्चाच व्हायला हवी असे नाही, आता युद्धभूमीवरच युद्ध झाले पाहिजे. माझ्या देशावर मोठा अन्याय झाला, आता आकाशातून आगीचा वर्षाव होईल असा डायलॉग या टिझरमध्ये ऐकायला येतो. त्याच सोबत कंगना वायू सेना अधिकारीच्या लूकमध्ये दिसून येते.
‘भारताला छेडले तर सोडणार नाही’, हा चित्रपटाच्या संपूर्ण कथेचा सारांश आहे. कंगना स्टारर हा चित्रपट 27 ऑक्टोबरला रिलीज होत आहे या चित्रपटाचा ट्रेलर 8 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा टीझर रणांगणावर राज्य करण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय हवाई दलाचा खरा आत्मा दाखवतो. मात्र, चित्रपटातील संवाद तितकेच दमदार आहेत की नाही हे ट्रेलरनंतरच कळेल.
पायलट तेजस गिलच्या भूमिकेत कंगना
एअरफोर्स पायलट तेजस गिलच्या मुख्य भूमिकेत कंगना राणौतला लोकांनी पसंत केले आहे. ‘तेजस’ ही हवाई दलातील वैमानिक तेजस गिलच्या धाडसी प्रवासाची दमदार कथा आहे.