पुणे :- शहराच्या मध्यवर्ती भागातील मिरवणूक परिमंडळ एकच्या हद्दीतून जाते. यामुळे दरवर्षी परिमंडळ एकच्या उपायुक्तांवर मोठी जबाबदारी असते. मंडळांचे मानापमान संभाळण्याबरोबच ते लवकर मार्गस्थ कसे होतील याचे नियोजनही त्यांना करावे लागते. ही नियोजन परिमंडळ एकचे उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी योग्य प्रकारे पार पाडले.
त्यांनी मानाच्या मंडळांशी सातत्याने केलेली चर्चा तसेच त्यांना विश्वासात घेऊन केलेली शिष्टाई कामी आली.मुख्य विसर्जन मार्ग लक्ष्मी रस्त्यावर त्यांची मोठी छाप दिसत होती. त्यांच्या नियोजनामुळे मानाचे पाचही गणपती तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ठरलेल्या वेळेत निघुन विसर्जनही वेळेत झाले.
गिल सकाळी दहा पासून लक्ष्मी रस्त्यावर गस्त घालत होते. स्वत: पुढाकार घेऊन मंडळांना पुढे सरकवत होते. रात्री बारापर्यंत त्यांनी लक्ष्मी रस्त्यावर चोख नियोजन केले. गरज पडेल तीथे बळाचाही वापर केला. मंडळ लवकर पुढे सरकत नसताना काही ठिकाणी बंदोबस्तावरील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.
गिल यांच्या प्रेमाखातर एका गणेश मंडळांने त्यांचे कट आऊट वापरुण कोयता गॅंगचा बिमोड केल्याचा देखावा मिरवणूकीत सादर केला. पुणे शहरात प्रथमच अशा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा देखावा गणेश विसर्जन मिरवणूकीत सादर करण्यात आल्याने गिल चर्चेचा विषय झाले होते.
पोलीस मंडपात खुर्च्या टाकून बसले होते. ही बाब जेव्हा उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी पाहिली तेव्हा त्यांनी पोलिसांना खडसावून त्यांच्या खुच्या बाजूला फेकून दिल्या.
त्यांना एकाच जागेवर न बसला मंडळांना पुढे ढकलण्याचा आदेश दिला. त्यांचा रुद्रावतार पाहूण पोलिस लागलीच मंडळांकडे धावले. पुणेकरांकडून गिल तसेच खुद्द पोलीस आयुक्तांकडूनही गिल यांचे कौतुक झाले.