मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मेहुणा जो जोनास आणि सोफी टर्नर यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रसिद्ध हॉलिवूड गायक जो जोनासने लग्नाच्या चार वर्षानंतर सोफी टर्नरपासून घटस्फोटा घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. रिपोर्टनुसार, घटस्फोट हा जोसाठी शेवटचा पर्याय होता. त्याला कधीही आपले कुटुंब तोडायचे नव्हते, पण त्याला आपल्या मुलींसाठी जे चांगले होते ते त्याला करायचे होते. दु:खी घर हे घर नाही आणि सत्य हे आहे की तो आणि सोफी बर्याच काळापासून यातून जात आहेत. अशी चर्चा सध्या सोशल सुरु आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जो जोनास आणि सोफी टर्नर वैवाहिक जीवनात वादविवाद सुरु असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे, यानंतर घटस्फोटाच्या अफवा पसरू लागल्या. गेल्या काही आठवड्यात या जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या अंगठीशिवाय पाहिले गेले होते. अफवा पसरू लागल्यानंतर, जो जोनासने या आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तो त्याच्या एंगेजमेंट रिंग घातलेला दिसत होता.
सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये एंगेजमेंट केली आणि 2019 मध्ये लास वेगासमध्ये चॅपल येथे लग्न केले. नंतर या जोडप्याने फ्रान्समध्ये अधिकृत विवाह सोहळा आयोजित केला. ज्यामध्ये कपलचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. सोफी आणि जो यांनी जुलै 2020 मध्ये लेक विलाचे स्वागत केले. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे स्वागत केले.