मुंबई – : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या ‘हड्डी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेन्डरची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटातील पोस्टरमधील त्याच्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या या लुकचे विशेष कौतुक देखील करण्यात आले होते. मात्र बहुचर्चित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात नवाजुद्दीनसह अनुराग कश्यप असणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडरच्या लुकमध्ये दिसतो आहे. तर त्याच्यासोबत अनुराग कश्यपही दिसत आहे. अनुराग कश्यप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. Has revenge ever looked this bone-chilling? अशी पोस्ट त्याने केली आहे. 7 सप्टेंबरला ZEE5 वर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांच्यासोबतच हड्डी या चित्रपटामध्ये सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा, इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे. नवाजुद्दीनचे गँग्स ऑफ वासेपूर, तलाश, बजरंगी भाईजान, मांझी द माऊंटन मॅन, किक हे चित्रपटही विशेष गाजले होते. त्यानंतर पहिल्यांदाच हड्डी सिनेमात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहे.