मुंबई – महाराष्ट्र युनियन गोजू रियो कराटे दो असोसिएशनने आयोजित केलेली महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धा 2023 काल दि. 20 ऑगस्ट, 2023 रोजी मुंबई येथे पार पडली. या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्यू .कॉलेज, बावधन येथील विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला.
पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्यू .कॉलेज, बावधनच्या विद्यार्थांनी या स्पर्धेदरम्यान 2 सुवर्णं व 1कास्य पदक पटकवले. या स्पर्धेत पार्थ येवले याने 11वर्षे वयोगटात, 25 किलो मुलांच्या संघात ‘कु्मिते’ या प्रकारात सुवर्णं पदक मिळवले.
स्वरा माने हिने नऊ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघात ‘काता’ या प्रकारात सुवर्णं पदक मिळवले. तर सृष्टी माने हिने बारा वर्षे वयोगटातील चाळीस किलो मुलींच्या गटात ‘कु्मिते’ या प्रकारात कास्य पदक मिळवले.
कराटे प्रशिक्षक व शाळेचे क्रीडा शिक्षक श्रेयस गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी उत्तम मार्गदर्शन केले. पेरिविंकलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.