मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका पार्टीत बॉलिवूडचा भाईजान त्याच्या नव्या लुकमध्ये दिसला. सलमान खान ‘तेरे नाम 2’ ची तयारी करत असल्याची त्याच्या नव्या लूकमुळे चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या कारमधून उतरताना दिसत आहे. भाईजान एका पार्टीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. यादरम्यान, सलमान बाल्ड लूकमध्ये दिसला. या पार्टीसाठी सलमानने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. व्हिडिओमध्ये चाहते ‘भाई, भाई’ असे ओरडताना ऐकू येतात. त्याचवेळी पॅप्सनेही सलमानच्या या नव्या लुकचे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवला आहे. सोशलवर सलमानचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
View this post on Instagram
सलमानचा नवीन लूकमुळे तो ‘तेरे नाम 2’ ची तयारी करत असल्याच्या शक्यता चाहत्यांकडून केली जात आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, “तेरे नाम 2 स्क्रिप्ट तयार आहे.” दुसऱ्याने लिहिले, “शायद तेरे नाम 2 आ रही है.” सध्या सलमान खान 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘टायगर 3’ च्या रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आणि आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर टायगर आणि झोयाच्या जोडीची जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच वेळी, निर्माते हा चित्रपट मोठा आणि चांगला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.