मलेशिया : खासगी विमान रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळून भीषण अपघात झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना मलेशियातील क्वालालंपूर याठिकाणी घडली आहे. या घटेनेचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार , मलेशिया येथील क्वालालंपूर याठिकाणी एक खासगी जेट विमानात तांत्रिक बिघाड होऊन ते क्रॅश झाले. एका हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर येऊन आदळल्याने या विमानाचा भीषण स्फोट झाला आणि आगीचे लोट मोठ्या प्रमाणात लोट उसळले.
⚡️In Malaysia, at least 10 people were killed when a plane crashed on a highway — TASS pic.twitter.com/9smaKfFpuV
— War Monitor (@WarMonitors) August 17, 2023
दुसऱ्या वाहनांच्या पार्किंग कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद झाले आहे. या अपघातात रस्त्यावरील दुसऱ्या लेनमध्ये असेलले वाहन थोडक्यात वाचले असल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रस्त्यावर उसळलेले आगीचे लोट पाहून आपलीही झोप उडेल. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल झाली असून त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली.