ब्रुसेल्स – युरोपीय संसदेच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान अलेक्झांडर डे क्रू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची घोषणा करताना अलेक्झांडर यांना अश्रु अनावर झाले होते.
आपल्याला प्रचार करण्याची भीती वाटू लागली आहे. हा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. या निकालामुळे मला धक्का बसला आहे. आणि म्हणून मी या निकालाची जबाबदारी घेतो, असे व्हायचे नव्हते, असे डी क्रो यांनी माध्यमांना सांगितले.
डी क्रो यांच्या ओपन व्हीएलडी पक्षाला युरोपियन संसदेत फारशी कामगिरी करता आली नाही. या पक्षाला फक्त ५.८ टक्के मते मिळाली. उजव्या विचारांच्या व्लाम्स बेलांग पक्ष आणि फ्लेमिश राष्ट्रवादी एन-व्हीए पक्षाला अनुक्रमे १४.८ टक्के आणि १४.२ टक्के मते मिळाली.