मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कियाराने चित्रपटाच्या सेटवरून ब्रेक घेतला ती असून अमृतसरला निघाली. जिथे तिने वाघा बॉर्डरला भेट दिली.
View this post on Instagram
तेथील आर्मीच्या जवानांना तिने भेटत, काही मजेदार एक्टिवीटिजमध्ये भाग घेतला. तिने सैन्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली. सैनिकांचा सन्मान करण्यासाठी वाघा बॉर्डरवर काही वेळ घालवला. तिचे सैनिकांसोबतच्या संवादाचे फोटो आणि व्हिडिओ सोशलवर शेअर करण्यात आले आहे. हिरव्या रंगाचा सलवार सूट परिधान केलेल्या कियाराने तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
रिपोर्ट्सनुसार, कियाराने त्या ठिकाणी झाडे लावली आणि काही शूटिंग सरावात भाग घेतला. कियाराने अधिकाऱ्यांशीही संवाद साधला आणि त्यांच्यासोबत ग्रुप फोटोसाठी पोज दिली. शेरशाह या चित्रपटातील कियाराच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कियारा अमृतसरला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर दिसली होती.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, कियारा अखेरची सत्यप्रेम की कथा मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. अभिनेता राम चरण सोबत आगामी ‘गेम चेंजर’ या चित्रपटाद्वारे जवळपास चार वर्षांनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. कियारा हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपट वॉर 2 चा एक भाग असल्याची चर्चा आहे.