दिल्लीत टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मदर डेअरीने बुधवारी त्यांच्या किरकोळ स्टोअरमध्ये 259 रुपये प्रति किलो दराने विक्री केली आहे. प्रमुख उत्पादक प्रदेशांमध्ये अतिवृष्टीमुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे टोमॅटोच्या किंमती गेल्या महिनाभरापासून वाढल्या आहेत.
मदर डेअरीच्या रिटेल स्टोअरमध्ये टोमॅटोची किंमत 259 रुपये प्रति किलो –
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर 14 जुलैपासून अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानीत टोमॅटोच्या किरकोळ किमती मंदावल्या होत्या, परंतु कमी पुरवठ्यामुळे दर पुन्हा वाढले आहेत. टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी 203 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली, तर मदर डेअरीच्या रिटेल स्टोअरमध्ये त्याची किंमत 259 रुपये प्रति किलो होती.
अवकाळी पावसामुळे देशभरात टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम –
मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, “असामान्य हवामानामुळे (अवेळी पाऊस) गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दिल्लीची मुख्य बाजारपेठ असलेल्या आझादपूरमध्येही टोमॅटोची आवक कमी झाली आहे. कमी पुरवठ्यामुळे घाऊक किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे, त्याचा परिणाम किरकोळ किमतींवरही झाला आहे.
आशियातील सर्वात मोठ्या फळे आणि भाजीपाला बाजारात टोमॅटोचे भाव 170-220 रुपये प्रति किलो –
आशियातील सर्वात मोठी घाऊक फळे आणि भाजीपाला मार्केट आझादपूर मंडई मध्ये बुधवारी टोमॅटोचा घाऊक दर प्रति किलो 170-220 रुपये होता. आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे कारण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.” ते म्हणाले की, आझादपूर मंडईत बुधवारी फक्त 15 टक्के टोमॅटोची आवक झाली कारण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून फक्त सहा छोटे ट्रक येथे आले. कौशिक यांनी मात्र येत्या 10 दिवसांत पुरवठ्याची स्थिती सुधारण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.