मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ नामांकित वृत्त वाहिनी लोकशाहीने प्रसारित केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करतात अशात आता या कथित व्हिडिओ क्लीपमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून आता पहिल्यांदाच किरीट सोमय्या यांनी ट्विट करत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे की,एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी.’ असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
किरीट सोमय्या यांचे ट्विट
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023