मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या तिच्या चित्रपटामुळे नाही तर वेगळयाच कारणामुळे चर्चेत आहे. इलियाना लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती शेअर केली होती. मात्र तिच्या बाळाचे वडील कोण? हा प्रश्न सतत उपस्थित केला जात होता. लग्नाआधीच ती गरोदर होणार असल्याने तिला खूप ट्रोल करण्यात आले. अखेर तिने बॉयफ्रेंडचा एक खास फोटो शेअर करत या सगळ्याचा खुलासा केला आहे.
इलियानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या बॉयफ्रेंडचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच तिने याला ‘डेट नाइट’ असे कॅप्शनही दिले आहे. मात्र तिने त्याचे नाव काय आणि तो कोण आहे हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसेच तिने शेअर केलेला फोटो हा होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
इलियाना सध्या परदेशात असून तेथील हॉटेलमधील हा फोटो तिने शेअर केला आहे. ते दोघेही परदेशातील एका हॉटेलमध्ये बसल्याचे दिसत आहे. यावेळी इलियाना फारच आनंदी असल्याचे पाहायला मिळते. यातील एका फोटोत इलियाना त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे. तर एका फोटोत ते दोघेही हसताना दिसत आहेत. इलियानाने शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. इलियानाने पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवला आहे. तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो पाहून चाहते आनंदी झाले आहेत.
याआधी इलियानाने इनस्टाग्रामवर एका व्यक्तीचा हात आपल्या हातात घेतल्याचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, ‘माझी रोमान्सची कल्पना. त्याला शांतपणे जेवण करू देत नाही.’ यामध्ये इलियनाच्या हातावर डायमंड रिंगसुद्धा दिसत होती. मात्र अद्यापही हा तिचा बॉयफ्रेंड असल्याचे स्पष्ट होऊ शकलेले नाही.