मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचाकन साप निघाला. यावेळी राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. यादरम्यान सकाळच्या सुमारास साप निघाल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
सकाळची पत्रकार परिषद सुरू संजय राऊत अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, पण साप निघाल्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली.यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला. सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या घनटेची पत्रकारांमध्ये आणि त्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.