वॉशिंग्टन – जुनी घरे किंवा वाडे यामध्ये नेहमीच जुन्या काळातील संपत्ती पुरलेली आढळते पण आता कॅलिफोर्नियामध्ये एका कुटुंबाला त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये लाखो जुनी नाणी आढळली आहेत या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून हा एक खजिनाच असला तरी ही सर्व नाणी बेसमेंट मधून हलवून बँकेपर्यंत पोहोचवणे एक मोठे आव्हान मानले जात आहे कारण ही सर्व नाणी जर बाहेर काढली तर ती सुमारे तीन ट्रक भरतील एवढी नाणी आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी स्वीकारण्यास परिसरातील कोणतीही बँक तयार नाही यापैकी काही नाणी अतिशय जुनी असून ती चलनातून बाहेरही पडली आहे या कुटुंबाला जी नाणी सापडली त्यामध्ये अनेक बंद पिशव्याही होत्या ज्यामध्ये आणखीन काही वेगळ्या प्रकारची नाणी होती जॉन रे या व्यक्तीच्या घरामध्ये ही घटना घडली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये जॉन रे आपल्या भावासोबत आपल्या घराची सफाई करत असताना घराच्या बेसमेंटमध्ये अनेक बंद पिशव्या आढळल्या त्या पिशव्यांमध्ये अनेक नाणी होती या नाण्याचे मूल्य अमेरिकेच्या चलनाचा विचार करता एक पेनी असे होते रात्रीत पण या सर्व नाण्यांचे एकत्रित मूल्य तब्बल दहा हजार डॉलर्स एवढे होते रे आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी ही एक प्रकारची लॉटरी असली तळघरातील संकुचित जागेतून हा सर्व खजिना बाहेर काढून बँकेपर्यंत पोहोचणे एक मोठे आव्हान मानण्यात येत आहे.
ज्या पिशव्यांमध्ये ही सर्व नाणी ठेवली आहेत त्या पिशव्या अत्यंत जड आहेत नाण्यांचेही एकत्रित वजन प्रचंड असल्यामुळे ती सर्व नाणी बाहेर काढून ती कशा प्रकारे बँकेपर्यंत पोहोचवायची याचाच विचार आता हे कुटुंब करत आहे जॉन ने यामधील एक पिशवी बाहेर कडून आपल्या बँकेकडे नेली पण बँकेने अशा प्रकारची नाणी स्विकारण्यास नकार दिला कारण अशा प्रकारची नाणी ठेवण्यासाठी बँकांकडे पुरेशी जागाही शिल्लक नाही कुटुंबाला ही जी लाखो नाणी सापडली आहेत त्यांचे एकत्रित मूल्य जरी 10000 डॉलर्स पर्यंत असेल असं मानण्यात येत असले तरी या नाण्यांमध्ये काही दुर्मिळ नाणी असू शकतात असाही काही तज्ञांचा अंदाज आहे या दुर्मिळनाण्यांची किंमत लाखो डॉलर्स पर्यंत असू शकते पण सापडलेल्या लाखो नाण्यांमधून असे एखादे दुर्मिळ नाणे शोधणे अत्यंत अवघड आहे असेही तज्ञांचे म्हणणे आहे.