मुंबई – बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी दरवेळी काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. लवकरच नवाझुद्दिन ‘हड्डी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात तो तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा फस्ट लुक समोर आल्यापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र या चित्रपटातील हा लुक देण्यासाठी त्याला तब्बल ६ महिने लागल्याचा खुलासा निर्मात्या राधिका नंदा यांनी केला आहे.
निर्मात्या राधिका नंदा म्हणाल्या की, “महिलांसाठी रोज तयार होणे किती कठीण असते आणि तयार झाल्यानंतर काम करणे किती कठीण असते हे नवाजुद्दीनला समजले. लूक फायनल करण्यासाठी आम्हाला ६ महिने लागले. आम्हाला त्याचा लूक फायनल करण्यासाठी अनेक मेकअप आर्टिस्टचा सल्ला घ्यावा लागला होता. नवाजुद्दीनला साडी घालण्यासाठी अर्धा तास आणि मेकअप करण्यासाठी तीन तास लागायचे. नवाजुद्दीनने या चित्रपटानिमित्त पहिल्यांदाच साडी नेसली, पण ती घालून तो अनेक तास शूटिंग पूर्ण करत असे.”
नवाजुद्दीनचे कौतुक करत निर्मात्या म्हणाल्या की, “नवाज खूप प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि मेहनती अभिनेता आहे. त्याने संपूर्ण चित्रपटाच्या शूटसाठी जवळपास ८० साड्या वापरल्या आहेत. जेव्हा नवाजने पहिल्यांदाच स्वतःला या लूकमध्ये आरशात पाहिलं तेव्हा तो खूप आनंदी झाला होता. त्याने स्वतःला असं आधी कधीच पाहिलं नव्हतं.”
View this post on Instagram
दरम्यान, हड्डी या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचे अनेक लूक्स आतापर्यंत शेअर केले आहेत. अक्षत अजय शर्माने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २३ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.