मुंबई – टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री गौहर खानचा लूक पूर्णपणे बदलला आहे. या गौहरने सोशल मीडियावर तिची वेटलॉस फोटो पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिचे कर्वी फिगर पाहून चाहते थक्क झाले आहेत.
गौहर खानने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करत खुलासा केला आहे की, तिने अवघ्या 10 दिवसांत 10 किलो वजन कमी केले आहे. एवढेच नाही तर गौहरने वजन कमी करतांनाच अनुभव शेअर केला आहे.
गौहर खान आणि जैद दरबार यांनी 10 मे रोजी लहान पाहुण्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आपल्या घरी मुलगा जन्माला आल्याची घोषणा केली होती पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बेबी बॉय. लेकाच्याच्या वतीने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या घरी खूप आनंद आला. 10 मे 2023 रोजी आनंदाचा अर्थ काय असतो हे आम्हाला समजले. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद..!’
इंस्टाग्रामवर मिरर सेल्फी शेअर करत गौहर खानने लिहिले, “डिलीव्हरीनंतर 10 दिवसात 10 किलो वजन कमी केले. अलहमदुलिल्लाह. अजून 6 किलो कमी करायचे आहेत. हॅशटॅग न्यू मॉम लाईफ.” या फोटोमध्ये गौहर खान फॅट टू फिट दिसून येत आहे.