पुणे – आज पहाटे पुण्यातील टिंबर मार्केट, रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
पुणे – आज पहाटे पुण्यातील टिंबर मार्केट, रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.#punefire pic.twitter.com/pVoLr4uxz3
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 25, 2023
पुणे कॅन्टोमेंट पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकुण १८ अग्निशमन वाहने याठिकाणी दाखल झाली होती. पहाटे ०४ वाजून १४ मिनिटांच्या आसपास ही आग लागल्याचे समजते. शेजारील असलेल्या तब्बल चार घरांना या आगीची झळ सोसावी लागली.
यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत १० सिलेंडर बाहेर काढले ज्यामुळे आग शेजारील वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये पसरू शकली नाही.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणे कॅन्टोमेंट पीएमआरडीए पिंपरी चिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे अक्षरं अद्याप समजू शकलेले नाही.