संदीप सातव यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल; प्रभात प्रभाव
वाघोली : वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव, मनपाचे ठेकेदार, नागरिक यांच्या तक्रारींची दखल मनपा प्रशासनाने घेतली असून वडगाव शेरी / नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांची पथ विभागात बदली करण्यात आली असून तसा आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दि. २३ रोजी काढला आहे. दैनिक प्रभात ने या प्रश्नाला वाचा फोडली होती.
वडगाव शेरी / नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांना तात्काळ निलंबित करून त्यांची खाते निहाय चौकशी करण्याबाबतचे तक्रार निवेदन भाजपचे संदीप सातव यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. दि. २५ रोजी या संदर्भातील कारवाई बाबत मनपा कायालयासमोर संदीप सातव यांचे सकाळी १० वाजता आंदोलन होणार होते.त्यापूर्वीच मनपा प्रशासनाने नामदेव बजबळकर यांची बदली करून या प्रकरणाला न्याय दिला आहे.
\
१४ ठेकेदारांनी मनपा आयुक्तांना प्रभारी आयुक्त यांच्या विरोधात आर्थिक पिळवणूक केल्याचे लेखी निवेदन दिले होते. वडगावशेरी नागरिक मंच च्या वतीने देखील पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. दि. २५ एप्रिल पासून या तक्रारीत वाढ होताना दिसत होती.
.. त्यांना अधिकाऱ्यांनी सुनावले
त्या वादग्रस्त सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात होर्डिंगच्या परवानगीसाठी पैशाची मागणी करत असल्याची तक्रार होर्डिंग चालकांनी एका अतिरिक्त आयुक्तांसमोर केली होती. त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची दखल घेत खाते प्रमुखांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची चर्चा वाघोलीत आहे.
मनपा प्रशासनाने सहायक आयुक्त यांची बदली केली आहे.मात्र त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचेवर तातडीने निलंबनाची कारवाई करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा.
संदीप सातव, माजी उपसरपंच, वाघोली