पुणे – ‘मेक इन इंडिया’चा नारा सरकारने दिला आणि संरक्षण दलानेही प्रतिसाद देत स्वदेशी बनावटीच्या अनेक लढाऊ शस्त्रास्त्रांची निर्मितीला सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणजे पाणबुडी. सहावी “वागीर’पाणबुडीही ताफ्यात सज्ज झाली असून, माझगाव गोदी येथे त्याची यशस्वी चाचणी झाली. या पाणबुड्या म्हणजे सागरी शक्तीतील शस्त्रास्त्र क्षमतेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. नौदलाचा प्रकल्प-75 आणि मेक इन इंडिया उपक्रमामधील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
“साहस, शौर्य आणि समर्पण’ असे ध्येयवाक्य असलेल्या नौदलात दाखल झालेली ही “वागीर पाणबुडी’ अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. 23 जानेवारी रोजी पाचवी स्कॉर्पिन प्रकारची, रडारला चकवा देणारी “आयएनएस वागीर’ पाणबुडी ताफ्यात दाखल झाली.
समुद्रातील घडामोडींवरही लक्ष
स्कॉर्पिन प्रकारच्या पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली आहेत. त्यांच्यामधली रडार यंत्रणा ही सर्वात अत्याधुनिक यंत्रणापैकी एक आहे. या पाणबुडीत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमतादेखील सुसज्ज आहे. या श्रेणीतील पाणबुडींवर आधुनिक “सोनार’ (डजछअठ – डर्जीपव छर्रींळसरींळेप अपव ठरपसळपस) यंत्रणा तसेच संवेदक यंत्रणा बसविलेली आहे. याद्वारे समुद्राच्या आतील घडामोडींवर लक्ष ठेवता येते.
सन 2047 पर्यंत “आत्मनिर्भर सैन्यदल’ होण्याच्या दृष्टीने ही सकारात्मक वाटचाल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सगळ्या पाणबुडींचा नौदलात समावेश हा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या काळात होत आहे. त्यामुळे “आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचाच हा एक भाग आहे, असे ऍडमिरल आर. हरीकुमार (नौदलप्रमुख) म्हणाले.
सर्वांत कमी वेळात निर्मिती
नौदलाच्या प्रकल्प 75 (पी-75) अंतर्गत यांची बांधणी झाली असून, आतापर्यंत स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या सर्व पाणबुडींमध्ये अत्यंत कमी वेळात बांधण्यात आलेली पाणबुडी असा मान वागीर पाणबुडीला मिळाला आहे.
“वागीर’ म्हणजे सायलेंट किलर…
हिंद महासागरातील प्राणघातक शिकारी माशाच्या एका प्रजातीवरून “वागीर’ हे नाव देण्यात आले आहे. त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात.
‘वागीर’चे वैशिष्ट्य
- संपूर्ण भारतीय बनावटीची
- कमी कालावधीत झालेली बांधणी
- रडारलाही चकवा देणारी
- समुद्रातील वाळूमध्ये वावरणारा शार्क असे त्याला संबोधले जाते
- लांब पल्ल्याच्या गाईडेड टोर्पेडोज आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज