नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या शाळेत बॉम्ब असल्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने शाळेला ई-मेल करुन बॉम्ब असल्याची माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
#UPDATE | The school has been thoroughly checked through BDT (Bomb Disposal Team) and nothing has been found: Chandan Chowdhary, Deputy Commissioner of Police, South Delhi
(file pic) pic.twitter.com/ExsGXA5NmM
— ANI (@ANI) May 16, 2023
दक्षिण दिल्लीतील पुष्पा विहार येथील अमृता शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून शाळा सील केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
बॉम्बच्या धमकीमुळे राजधानीतील शाळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.