सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणाहून स्फोटकांचा साठा आणि मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भेजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंतेशपुरम गावाजवळील जंगलात जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली, असे सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी पीटीआयला सांगितले. नक्षलवाद्यांनी डीआरजीच्या गस्ती पथकावर गोळीबार केला, त्याला गस्ती पथकानेही प्रत्युत्तर दिले.
चकमक शांत झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.गोलापल्ली स्थानिक संघटना पथकाचे कमांडर म्हणून सक्रिय असलेला मडकम एरा आणि त्याच पथकाचा उपकमांडर मडकम भीमे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. इरा आणि भीम यांच्या डोक्यावर अनुक्रमे 8 लाख आणि 3 लाख रुपयांची बक्षिसे होती.