नवी दिल्ली – चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. यावरूनच आता भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. सेहवागने धोनीच्या निवृत्तीबाबत आपले स्पष्ट मत देखील यावेळी व्यक्त केले.
याआधीही अनेकांनी धोनीला त्याच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर नाराजी व्यक्त करत सेहवाग म्हणाला की, हे त्याचे शेवटचे वर्ष असले तरी त्याने अशा प्रश्नांना नकार द्यावा आणि उत्तरे देऊ नयेत. जेव्हाही धोनीला वाटेल तेव्हा तो स्वत: या प्रश्नांची उत्तरे देईल असं रोखठोक मत सेहवागने यावेळी मांडले.
चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यादरम्यान सेहवाग क्रिकेट शोमध्ये बोलत होता. यावेळी त्याने धोनीच्या निवृत्तीवरून प्रश्न विचारण्यांना करारा जवाब दिला आहे. क्रिकेट शो दरम्यान सेहवाग म्हणाला – मला समजत नाही की लोक का विचारतात? त्याचे शेवटचे वर्ष असले तरी कोणत्याही खेळाडूला विचारायचे का? हा त्यांचा कॉल आहे, त्यांना घेऊ द्या ! हे त्याचे शेवटचे वर्ष आहे की नाही हे फक्त एमएस धोनीलाच माहीत आहे.
महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नईचे नेतृत्व करतोय. धोनी सध्या मैदानात बॅटिंगने तितका करिष्मा दाखवू शकत नसला तरी टीमच नेतृत्व करण्यामध्ये तो कुठेही कमी पडताना दिसत नाही. तो केवळ मैदानावर उभा असला तरी प्रतिस्पर्ध्यांवर दबाव येतो. म्हणुणच दिवसेंदिवस धोनीचे फॅनफॉलोईंग वाढतच चालले आहे.
आयपीएलमधील सध्याच्या टीम्सची आकडेवारी काय सांगते
गुणतालिकेत गुजरात संघ नऊ सामन्यांतून सहा विजय आणि १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी, लखनौ संघाने 10 सामन्यांत 5 विजय आणि एक अनिर्णित सामन्यात 11 गुण मिळवले आहेत. चेन्नईच्या बाबतीतही असेच आहे, परंतु उत्तम निव्वळ रन रेट असलेले लखनौ दुसऱ्या आणि चेन्नई तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बेंगळुरू आणि मुंबई प्रत्येकी 10 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पंजाबही १० गुणांसह सातव्या, कोलकाता सहा गुणांसह आठव्या, हैदराबाद सहा गुणांसह नवव्या आणि दिल्लीही सहा गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.