नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियानामधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्यारसपुरा परिसरात विषारी वायूच्या गळतीमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत या वायू गळतीमुळे 11 जण बेशुद्ध पडले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
वायू गळती ग्यारसपुरामधील एका रहिवासी इमारतीत सकाळी सव्वासातच्या सुमारास झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. तर अग्निशमन विभागाच्या मदतीने बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील केला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
#WATCH पंजाब: लुधियाना के ग्यासपुरा इलाके में गैस रिसाव की घटना सामने आई है। मौके पर NDRF की टीम पहुंच गई है और बचाव अभियान जारी है। pic.twitter.com/ILjXIO3KOY
— ANI_HindiNews (@AHindinews) April 30, 2023
या इमारतीत दुधाचे केंद्र होते. सकाळी दूध घेण्यासाठी गेलेले नागरिक बेशुद्ध झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. वायू गळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या आत लोक बेशुद्ध झाले. दरम्यान कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचं कारण काय, हे अजून समजू शकले नाही.
लुधियाना पश्चिमच्या उपविभागीय अधिकारी स्वाती यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी याविषयी सांगताना, हे गॅस गळतीचं प्रकरण आहे. एनडीआरएफची टीम लोकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी हजर असून त्यांनी बचाव कार्य सुरु सुरु आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 11 जण बेशुद्ध आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त समीर वर्मा घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली.
ਲੁਧਿਆਣਾ ਦੇ ਗਿਆਸਪੁਰਾ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਫ਼ੈਕਟਰੀ ਦੀ ਗੈਸ ਲੀਕ ਦੀ ਘਟਨਾ ਬੇਹੱਦ ਦੁੱਖਦਾਇਕ ਹੈ..ਪੁਲਿਸ, ਪੑਸ਼ਾਸਨ ਅਤੇ NDRF ਟੀਮਾਂ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਹਨ ..ਹਰ ਸੰਭਵ ਮਦਦ ਪਹੁੰਚਾਈ ਜਾ ਰਹੀ ਹੈ..ਬਾਕੀ ਵੇਰਵੇ ਜਲਦੀ..
— Bhagwant Mann (@BhagwantMann) April 30, 2023
तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लुधियानाच्या ग्यासपुरा इथल्या गॅस गळतीच्या घटनेची दखल घेतली आहे. “लुधियानाच्या ग्यासपुरा भागातील कारखान्यातून गॅस गळतीची घटना अत्यंत दुःखद आहे. पोलीस, सरकार आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. शक्य ती सर्व मदत केली जाईल,” असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.