मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे अयोध्येतील राम जन्मभूमीचं दर्शन घेतील. यानिमित्ताने शिवसेनेकडून एक टीजर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सध्या हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ असं म्हटल आहे. अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात शिवधनुष्य यात्रा सुरू करणार आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर जारी केल्यानंतर सोशल मीडियावर राजकारण चांगलेच तापले आहे. तर या टीझरमधून महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा, असे मुद्दे अधिक ठसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सोशल मीडियावर हा टीझर वेगाने व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेतेल. अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी ही टॅगलाइन असून राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि पंतप्रधान मोदी ते पूर्ण करत आहे. यात खारीचा वाटा म्हणून सागाची लाकडे आम्ही मंदिरासाठी पाठवली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळे अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं होतं.