मुंबई – चित्रपटांशिवाय दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच मोकळेपणाने बोलत असते. आता समंथाने खुलासा केला आहे की घटस्फोटानंतर जेव्हा ती पुष्पा चित्रपटातील आयटम नंबर ‘ओ अंतवा’ करत होती, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिला ते करण्यास मनाई केली होती. घटस्फोटानंतर लगेचच तिने असे आयटम नंबर करावेत असे तिच्या कुटुंबीयांना वाटत नव्हते, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
समंथाची नुकतीच एक मुलाखत प्रदर्शित झाली. ज्यात तिने आपल्या खाजगी आयुष्याबाबत देखील संवाद साधल्याचे समजते. यावेळी तिने तिचा घटस्फोट झालेला पती अभिनेता नागा चैतन्यबाबत देखील भाष्य केले. ‘जेव्हा मला ‘ओ अंतवा’ची ऑफर आली तेव्हा मी पतीपासून विभक्त होत होते असं समंथा सांगते. ती पुढे म्हणते,आम्ही विभक्त झाल्यानंतर मला अनेक मित्रांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी आयटम सॉंग न करता घरी बसण्याचा सल्ला दिला.
यावेळी मला चांगला सल्ला देणाऱ्यांनी देखील हे आयटम सॉंग न करण्याचा सल्ला दिला असल्याचे समंथाने सांगितले. ती म्हणते सगळीकडे माझ्या घटस्फोटाची चर्चा होती.. ट्रोलिंग सुरु झाले होते अशात मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारला मी काही चुकीचं करत नाही ना ? त्यावर मी कोणतीही चूक करत नसल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी ते गाणं केलं असं स्पष्ट मत समंथाने यावेळी व्यक्त केलं.
यावेळी बोलताना समंथाने विविध गोष्टींचा खुलासा केला. आपल्या रिलेशनमाबाबत अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. समंथाने आपल्या कामावर कोणत्याच गोष्टीचा प[परिणाम होऊ न दिल्याचे यावेळी सांगितले.