मुंबई : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वृक्ष लागवड करून सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण करणारे अभिनेता सयाजी शिंदे यांनी सर्वांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. मिळलेल्या माहिती नुसार सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला.
पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. सयाजी शिंदे यांनी माहिती दिली की, ‘ते सुखरुप आहेत. या घटनेत सयाजी शिंदे यांना दुखापत झालेली नाही. ते व्हिडिओमध्ये मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. परंतु काळजीचं काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या आहेत. कानाभोवती थोडी सूज आली आहे. मात्र आम्ही आता सुखरूप आहोत. चिंतेचं कारण नाही.