मुंबई – एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटाबाबतच्या अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे पुण्यातील कसब्यासह चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. अशात राजकीय वातावरण एकदम ढवळून निघालेले असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी या आधी राष्ट्रवादीमध्ये देखील काम केलेलं आहे. मात्र सध्या त्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न असो वा एखाद्या आमदाराला धारेवर धरणे असो चित्रा वाघ नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. नुकतंच एका मुस्लिम कार्यकर्त्याने पोटनिवडणुकीदरम्यान केलेल्या आवाहनाचा दाखला देत वाघ यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याचे पाहायला मिळते.
चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,” राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय आणि दुबई,सौदीतून मतदार आणा म्हणतात,मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात…इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…हा तर एकप्रकारे जिहादच..!” अशी टीका वाघ यांनी केली आहे.
काय म्हणाला होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नेमकं पहा Video
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय आणि दुबई,सौदीतून मतदार आणा म्हणतात,मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात…
इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…
हा तर एकप्रकारे जिहादच..! https://t.co/1zlWYOcHzS
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 23, 2023