नवी दिल्ली – शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावरून रस्सीखेच सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी अंतरिम निर्णय दिला. त्यानुसार, शिंदे आणि ठाकरे गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्हं बहाल करण्यात आली. ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले. त्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले.
ठाकरे गटाचे सध्याचे नाव आणि चिन्ह काही दिवसांपुरतेच असल्याचे सूचित होत आहे. निवडणूक आयोगाने नव्या निर्णयानुसार ठाकरे गटाला आताचे नाव आणि चिन्ह सध्याची विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे नाव, चिन्ह बदलण्याची शक्यता आहे.