ऍम्स्टरडॅम – ज्याप्रमाणे वादळ किंवा पावसाचा अंदाज वर्तवता येऊ शकतो, त्याप्रमाणे भूकंपाबाबत कोणतेही भाकित वर्तवता येऊ शकत नाही, असे म्हणतात. मात्र नेदरलॅन्डच्या एका संशोधकाने तुर्कीयेमध्ये झालेल्या भूकंपाबाबत अचूक भाकित वर्तवले होते. आपल्या अभ्यासानुसार पुढील मोठा भूकंप भारतामध्ये होणार असल्याचे भविष्य देखील या भविष्यवेत्त्याने वर्तवले आहे.
फ्रॅंक हुगरबीट्स असे या संशोधकाचे नाव असून ते नेदरलॅन्डमदील “सोलर सिस्टीस जिओमेट्री सर्व्हे’ या संस्थेमध्ये वरिष्ठ संशोधक आहेत. दिनांक 3 फेब्रुवारीला तुर्कीये आणि सीरियामध्ये 7.5 क्षमतेचा भूकंप होण्याचे भाकित त्यांनी वर्तवले होते. आता यापुढील भूकंप भारतामध्ये होण्याचा अंदाज त्यांनी 29 जानेवारीला वर्तवला आहे. फगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताला या भूकंपाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता असून या भूकंपाचा मोठा धक्का भारतीय सागरी भागामध्येच जाणवण्याची शक्यता असल्याचे फ्रॅंक हुरबीट्स यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भविष्यवाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतीय सागरी भूभागामध्ये भूगर्भातील मोठ्या हालचाली घडायला लागल्या आहेत. हवामानातील अचानक होणाऱ्या फेरबदलांच्या आदारे हा अंदाज वर्तवता येऊ शकतो. मात्र हा एक कच्चा अंदाज आहे. कदाचित मोठा भूकंप होणार नाही, असेही हुगरबीट्स यांनी म्हटले आहे.
हुगरबीट्स यांनी तुर्कीये, सीरिया आणि लेबेनानमद्ये दुसरा भूकंप होण्याचा अंदाज देखील वर्तवला होता. मात्र हा अंदाज म्हणजे दांभिक वैज्ञानिकपणा असल्याचे म्हटले जाते आहे. “सोलर सिस्टीस जिओमेट्री सर्व्हे’ही संस्था भूगर्भातील बदलांचा अभ्यास करते. मात्र हुगरबीट्स यांच्या भविष्यवाणीमध्ये वैज्ञानिकतेचा अभाव असल्याचे बोलले जाते आहे.