मुंबई : उर्फी जावेदवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे. त्यातच आता या प्रकरणावर आता अमृता फडणवीस यांना विचारले असता.त्यांनी अत्यंत तटस्थपणे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सामाजिक विषयांवरचे मत त्या परखडपणे मांडताना दिसतात. दरम्यान, अमृता यांचे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मूड बना लिया’ हे नवीन गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्याच्या एक कार्यक्रमात त्यांना उर्फीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
अमृता फडणवीस म्हणाल्या “मला आज यावर बोलायचे नाही. आज मी माझ्या मूड बना लिया है च्या लॉन्च बद्दल बोलणार आहे. तसेच सगळ्यांना विनंती करते की तेके नाचना वर डान्स करा, उर्फीला पण सांगा डान्स करायला.”असे म्हणून उर्फीचा विषय इथेच थांबवला असल्याचे पाहायला मिळाले.
अमृता फडणवीसांच्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टी-सीरिजच्या युट्यूबवर हे गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अमृता यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. अमृता यांनी हे गाणं गाण्याबरोबरच डान्सही केला आहे.