मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. मग कधी ती सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करते तर कधी एखाद्या राजकारणी नेत्याशी पंगा घेते. केतकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. आता देखील तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे.
नवीन वर्षाचा मुहूर्त साधत केतकीने एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यावरून बरेच वाद देखील झाले. केतकीला या व्हिडिओवर अनेकांनी भरमसाट प्रश्न विचारले. केतकीने यातील अनेकांना उत्तरे देखील दिली. यावेळी तिने काहींचे कौतुक केले तर काहींना अक्षरशः अपशब्द वापरले. याच दरम्यान एका युजरने केतकीच्या हातावर दिसत असलेल्या टॅटू बाबतही विचारले. 186/22’ अशा आकड्यांचा टॅटू केतकीने आपल्या हातावर केल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर केतकीने आपल्या टॅटूबाबत खुलासा केला आहे. ती म्हणते,”हा टॅटू म्हणजे माझा अंडर ट्रायल कैदी नंबर आहे. ते अंक कैदी नंबरचे आहेत,मी कोणालाही माफ करू शकते परंतु विसरू शकत नाही” असं उत्तर केतकीने दिले आहे. नवीन वर्षानिमित्त केतकीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच कॅचर्चेत आहे.
.
केतकीने दिलेल्या टॅटू बाबतच्या उत्तरानंतर नेटकऱ्यांनी या टॅटूचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कनेक्शन असलयाचे तर्क लावले आहेत. गेल्या वर्षी शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकी चितळे तब्बल ४१ दिवस कास्टडीमध्ये होती. त्यावेळेसचा हा कैदी नंबर असल्याच्या चर्चा आता नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सुरु केल्याचे पाहायला मिळते.