पिंपरी, दि. 3 – ज्येष्ठ नेते, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे आज (मंगळवार) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आमदार जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये आज बंद राहणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
आमदार जगताप यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर जगताप यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आमदार जगताप महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक होते. त्यांनी सन 2000 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर पदही भूषविले. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. आमदार जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये आज बंद राहणार असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली आहे.