नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून संपूर्ण देशात वादळ उठलं. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगांची बिकिनी परिधान केली आहे. यावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही याच गाण्यामुळे ‘पठाण’ चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, भगव्या बिकिनीच्या वादानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संबंधित महिला भगव्या रंगाचे आइसक्रीम खाताना दिसत आहे. भगव्या रंगावर भारतीय जनता पार्टीचा ‘कॉपीराइट’ आहे का? असा सवालही संबंधित महिला व्हिडीओमध्ये विचारत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
😂😂😂😂 pic.twitter.com/okRP44O6kf
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 1, 2023
व्हायरल व्हिडीओत संबंधित महिला भाजपाला आव्हान देताना दिसत आहे. “भगव्या रंगावर कुणाचा कॉपीराइट आहे का? हे मला दाखवून द्यायचं आहे. भगव्या रंगावर भाजपाचा कॉपीराइट आहे का? हे माझं आइसस्क्रीम आहे, मी चाटणारच…” असे संबंधित महिला व्हिडीओत बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडीओमधील महिला नेमकी कोण आहे? तिचा कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.