आमदार दिलीप मोहिते पाटील : ही भविष्यातील नांदी
राजगुरूनगर: गावागावांतील निवडणूक स्थानिक नागरिकांवर अवलंबून असतात. जास्तीत जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादी पक्षाला मानणाऱ्या असतात. त्यामुळे मी ग्रामपंचातीच्या प्रचाराला जात नाही. ती निवडणूक कार्यकर्त्यांवर सोपवली जाते. स्थानिक कार्यकर्ते निवडणुकीत उमेदवार निवडून आणतात. आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आल्याने ही भविष्यातील नांदी आहे. स्थानिक निवडणुका पक्षविरहित होतात याचे उदाहरण साकुर्डी, कोरेगाव खुर्द आहे. या दोन गावांत राज्याचे भाजपचे मोठे नेते तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभा घेतली तरीही तेथे उमेदवार निवडून आले नाहीत हे त्यांचे अपयश असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
आमदार दिलीप मोहिते पाटील हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे असल्याने त्यांनी फोनद्वारे ग्रामपंचायतीच्या निकालाची प्रतिक्रिया दिली, त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. दरम्यान, ग्रामपंचात निवडणुकीत विजयी उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कार्यलयात गर्दी केली. तेथे निवडून आलेल्या उमेदवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, मंगल चांभारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, अंकुश राक्षे, नामदेव गोपाळे, सुजाता पचपिंड आदीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खेड तालुक्यातील ग्रामपंचायती या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने आहेत. भाजप पक्षाच्या अजेंठ्यावर ग्रामपंचातीच्या निवडणूक प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे साकुर्डी गावात गेले. गावाच्या विकासासाठी चांगल्या कार्यकर्त्याला निवडून द्या असे आवाहन केले होत; मात्र त्यांनी या गावांचा अभ्यास करून तेथे जायला पाहिजे होते. कारण नसताना साकुर्डी गावात जाऊन चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची फजिती करून घेतली, असा टोला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लगावला. दरम्यान, विजयी झालेल्या सरपंचांसह सदस्यांचे आमदार मोहिते यांनी अभिनंद केले आहे.
गावाची समीकरणे वेगवेगळी
ग्रामपंचायत निवडणूक या पक्षावर लढविल्या जात नाहीत मात्र विविध चॅनेलवर दाखवणाऱ्या बातम्यामध्ये पक्षीय बलाबल दाखवले जाते ते तथ्यहीन आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्ष चिन्हावर लढविली जात नाही. गावाची समीकरणे वेगवेगळी असतात.