राहाता – तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूकीत सरपंच पदासह सर्व जागांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाला निर्विवाद यश मिळाले आहे. लोहगाव ग्रामपंचायत यापुर्वीच सदस्य आणि सरपंच बिनविरोध निवडून आल्याने तालुक्यात झालेल्या बाराही गावांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे.
राहाता तहसील कार्यालयात आज मतमोजणी झाल्यानंतर अकरा ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर झाले. डोऱ्हाळे- सरपंच सारीका नवनाथ अंबेडकर. सदस्य सुनिल जपे, गोपीनाथ डांबे, वैभव डांगे, संगिता बाबासाहेब सरोदे, आश्विनी कृष्णा डांगे या तर विखे पाटील यांना मानणाऱ्याच दुसऱ्या गटातील सतिष गव्हाणे, भारती सोमनाथ लांडगे, सुरेखा आप्पासाहेब लांडगे. नादुर्खी बुद्रूक- सरपंच माधव चौधरी. सदस्यपदी सचिन कोळगे, अमोल चौधरी, अलका आप्पासाहेब दाभाडे, विरेश चौधरी, शशिकला लक्ष्मण भराटे, छाया रामनाथ वाकचौरे, अरुण चौधरी, अलका चौधरी, छाया चौधरी, रुषभ चौधरी आणि अनिता अमोल कोळगे. नांदूर्खी खुर्द- सरपंच आशा संजय आरणे . सदस्यपदी सुनिल वाणी, रुपाली स्वप्नील दाभाडे, मनिषा कचेश्वर वाणी, सचिन दाभाडे, सुचिता जनार्दन वाणी, विजयकुमार वाणी, कमलाबाई विजय वाणी.
खडकेवाके- सरपंच संगिता सचिन मुरादे.सदस्यपदावर जालिंदर मुरादे, जयश्री राजेंद्र मुरादे, कविता सुदाम लावरे, सोमनाथ मुजमुले, हिराबाई राजेंद्र मुरादे, मनिषा प्रकाश लावरे, दिपक गायकवाड, बाळासाहेब लावरे, आश्विनी रविंद्र सुरासे.
आडगांव खुर्द – सरपंच अनिल सुभाष बर्डे. सदस्यपदासाठी प्रकाश शेळके, अलका चांगदेव शेळके, सुनिता विजय काळे, नवनाथ माळी, दिनकर कडलग, निषा विजय गायकवाड.
नपावाडी- सरपंच पल्लवी राजेंद्र इल्हे. सदस्य पदासाठी विलास धनवटे, धनंजय उगले, वैशाली राजेंद्र धनवटे हे विखे पाटील व काळे गटाचे उमेदवार विजयी झाले असून, कोल्हे गटाचे दिपक वहाडणे, उज्वला सुभाष वहाडणे, सुनिता भागवत उगले, विशाल धनवटे, अलका सांळूखे, कल्पना विक्रम वहाडणे.
निघोज- सरपंच शोभा नवनाथ मोरे. सदस्य पदाकरीता फ्रान्सीस जगताप, भानुदास गाडेकर, संदीप मते, निकीता राजेंद्र जगताप, शितल नानासाहेब गव्हाणे, बाळासाहेब मते, संगिता भारत मते, प्रतिभा आप्पासाहेब चव्हाण, प्रसाद मते, पायल रविंद्र रोकडे, सुनिता विलास मते.
रांजणखोल- सरपंच शुभांगी बाबासाहेब ढोकचौळे. सदस्य म्हणून भाऊसाहेब ढोंकरे, रमेश ढोकचौळे, संगिता राजू गायकवाड, जयश्री कैलास ढोकचौळे, संदीप अंभग, चांगदेव ढोकचौळे, शकिल पठाण, सविता सिध्दार्थ बागुल, परवीन जाकीर शेख, सुलाबी अब्दुल पांडे हे विजयी झाले आहेत. गंगुबाई लांडगे, सागर ढोकचौळे, कल्पना दिलीप यादव हे यापुर्वीच बिनविरोध निवडून आले.
सावळीविहीर बुद्रूक- सरपंच ओमेश साहेबराव जपे. सदस्यपदासाठी यापुर्वीच दत्तात्रय आगलावे, दिलीप गायकवाड, गणेश आगलावे, शैला महेंद्र पवार, माया महेश जपे, आशिष आगलावे हे बिनविरोध निवडून आले. मतदानानंतर सुजाता अमोल भोसले, मिना छबु बनसोडे, सागर आरणे, रुपाली संजय जपे, विकास जपे, सुवर्ण प्रदिप नितनवरे, केशरबाई गणपत सदाफळ, संतोष कसबे आणि आशा पुनम कोठारी.
साकुरी- सरपंच मेघना संदीप दंडवते. सदस्य पदाकरीता बाबासाहेब शिंदे, सविता शिवाजी नजन, रुपाली बाबासाहेब रोहोम, रावसाहेब बनसोडे, नंदा गणेश माळी, गौरव उपाध्ये, करुणा भारत बनसोडे, निकिता रोहोम, विश्वनाथ बनसोडे, सचिन बनसोडे, कल्याणी नसोडे, दिलीप बनसोडे, पुंडलीक बावके, सिंधू नारायण देवकर.
राजूरी- सरपंच संगिता जालिंदर पठारे. सदस्यपदासाठी नितीन गाडेकर, सोमनाथ गोरे, सुरेखा कदम, अनिता दळे, सोमनाथ कदम, भगवान गोरे, हौशीराम जाधव, सपना मधुकर गोरे, सोनाली शिवनाथ गोरे, रिजवान शौकत पठाण, स्वाती तुषार लाळगे हे विजयी झाले.