दोहा – फिफा विश्वकरंडक ( FIFA WorldCup ) फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून उद्या, रविवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या सामन्यात अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिनिओल मेस्सीला जेतेपदाची चाहुल लागली आहे. आठ वर्षांपूर्वी त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. आता उद्या होणाऱ्या सामन्यात फ्रान्सला नमवित जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची मेस्सीला संधी आहे. तर फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची संधी असून दोन्ही संघांना तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची प्रतीक्षा आहे.
#BBL | टी-२० क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम; स्टार फलंदाजांनी सजलेला संघ अवघ्या १५ धावांत गारद
अर्जेंटिनाच्या संघात चपळ, युवा खेळाडूंचा समावेश आहे. परंतु अनुभवाच्या आघाडीवर फ्रेंच संघ सरस असल्याने ही लढत रोमांचक ठरेल. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यत 12 सामने झाले आहेत. यात 6 सामने अर्जेंटिनाने जिंकले असून फ्रान्सला 3 वेळा विजय नोंदविता आला आहे, तर 3 सामने बरोरीत राहिले. विश्वकरंडक ( FIFA WorldCup ) स्पर्धेत दोन्ही संघाचा तीन वेळा सामना झाला असून फ्रान्सने दोनदा, तर अर्जेंटिनाने 1 वेळा बाजी मारली आहे.
पहिल्याच साखळी सामन्यात अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवातून सावरत पुढे लगेच मुसंडी मारत मेस्सीच्या संघाने शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली. हा संघ केवळ मेस्सीवर अवलंबून नाही. त्यांच्याकडे तरुण आणि चपळ आघाडीपटू आहेत. या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या बचावफळीनेही यशस्वी कामगिरी केलेली आहे. आता एमबापे, ग्रिझमान, जिरूड आणि डेम्बेले या चार जणांचे एकत्रित हल्ले थोपवणे हे अर्जेंटिनाच्या बचावफळीसमोरील आव्हान असणार आहे.
दुसरीकडे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही फ्रान्सचा संघ तुलनेत सरस आहे. गुणवत्ता आणि अनुभवाची समृद्धी हे त्यांच्या संघाचे वैशिष्ट्य आहे. चार वर्षांपूर्वी अंतिम सामन्यात खेळल्यामुळे या संघाला इतक्या महत्त्वाच्या सामन्याचा अनुभव आहे. मात्र, लिनिओल मेस्सीसारख्या अवलियाला रोखण्यात भल्याभल्यांची भंबेरी उडते. फ्रान्सच्या बचाव फळीकडे आणि विशेषतः मधल्या फळीकडे असलेला चापल्याचा अभाव त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
🇦🇷 Lionel Messi = 47 points
🇫🇷 Kylian Mbappé = 46 pointsWho will be leading the way for your team in #WorldCupFantasy?
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 17, 2022
पडणार पैशांचा पाऊस (रक्कम कोटीत)
विजेता संघ- 347
उपविजेता संघ- 248
तिसऱ्या क्रमांकावरील संघ – 223
चौथ्या क्रमांकावरील संघ- 206
उपांत्यपूर्व फेरीतील संघ – 126
उपउपांत्यपूर्व फेरीतील संघ – 96
विश्वकरंडक स्पर्धेतील सहभागी संघ – 73 कोटी
फ्रान्सला धक्का
अंतिम सामन्यापूर्वी फ्रान्स संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील काही खेळाडू हे आजारी पडले आहेत. या अतिमहत्वाच्या सामन्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना किंग्सले कोमन, इब्राहिमा कोनाटे आणि राफेल वॅरने हे खेळाडून आजारी आहेत. यामुळे वॅरने आणि कोनाटे हे शुक्रवारी (16 डिसेंबर) सरावाला आले नाही. हे दोघेही मोरोक्को विरुद्धच्या उपांत्य सामन्यात अंतिम अकरामध्ये होते. यामुळे त्यांची विश्वचषक अंतिम सामन्याची तयारी विस्कळीत झाली आहे. तसेच उपांत्य फेरीपूर्वी डिफेंडर डेयट उपामेकानो, मिडफिल्डर एड्रियन रॅबियो आणि विंगर किग्सले कोमन हे आजारी होते.