मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावरून देखील बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. “साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी,प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी!” अशी आशयाची एक पोस्ट खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केली आहे.
साहेब…
जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/qK0ZufV9is— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
संजय राऊत यांनी बाळासाहेबांसोबतच एक जुना फोटो देखील यावेळी शेअर केला आहे. ‘हे नातं खूप जुनं आहे,विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र अशा ओळी देखील राऊत यांनी यावेळी लिहिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी कालच घेतले दर्शन
शिवसेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेबांचा हा पहिलाच स्मृतिदिन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर हजेरी लावत दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटातील इतर सहकारी देखील होते. आजच्या स्मृतीदिनानिमित्त कोणताही वाद नको यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी एक दिवस आधीच स्थळावर हजेरी लावल्याचे समजते.