वाल्हे (जि, पुणे) – वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त बुधवार (दि.२६) ऑक्टोबर पहाटे ५ :३० वाजता संगीतमय स्वरमयी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाल्हे (ता.पुरंदर) व पंचक्रोशीतील रसिकांसाठी यंदाची दिवाळी सलग दुसर्याही वर्षी संगीतमय होणार होणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे ही संगीतमय मैफील रसिकांना अनुभवता येणार आहे.
यावेळी निर्माता- निवेदक महेश गायकवाड, गायक गणेश मोरे, गायिका अश्विनी कुरपे, गायिका पल्लवी आनदेव, वादक नितीन खंडागळे, हिमांशु बक्षी, संजय खाड्ये, हर्षद गणबोटे, प्रथमेश मोरे, ध्वनी संयोजन गौतम साऊंड (राजरत्न) आणि सहकारी यांच्या स्वरमयी पहाट कार्यक्रमात भक्तीगीते, भावगीते, लोकगीत आणि मराठी – हिंदी चित्रपट गीतांची सुरेल मैफिल एक आगळा वेगळा कार्यक्रम यावेळी होणार आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार यांनी दिली.
दरम्यान, “दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त असून अश्विन महिना संपून, कार्तिक महिनाचा प्रारंभ. प्रतिपदा निमित्त, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मुर्तीला दही, दुधाने स्नान घालुन महापूजा, अभिषेक व भोपाळी होणार आहे, मंदिर परिसरात फुलांची सजावट व रांगोळी काढून मंदीर सुशिभीत करण्यात येणार असल्याची माहीती”; श्री भैरवनाथ मंदिराचे पुजारी सचिन आगलावे यांनी दिली.