मुंबई – बाहुबली फेम ‘प्रभास’ला आज कोण ओळखत नाही. देशभरासह विदेशात देखील प्रभासचे फॅन्स आहेत. बाहुबली चित्रपटानंतर प्रभासने कमी बजेट किंवा लो बजेट असलेल्या चित्रपटांमध्ये कामच केलं नाही. बाहुबलीनंतरचे त्याचे प्रत्येक सिनेमे बिग बजेटच राहिले. म्हणुणच तो इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.प्रभास लक्जरी लाईफ स्टाईल जगणाऱ्या साऊथ स्टार्स पैकी एक आहे.
प्रभासच्या नेटवर्थबद्दल बोलायचे तर तो 215 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. त्याच्या कमाईचा मोठा भाग ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणुकीतून येतो. प्रभास पूर्वी दक्षिण भारतातील ब्रँड्सना एंडोर्स करायचा, पण बाहुबली रिलीज झाल्यापासून त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली आहे. तो अनेक जगप्रख्यात ब्रँड्सच्या जाहिराती करतो.
प्रभास आलिशान डिझायनरच्या घरात राहतो. हैदराबादच्या प्राइम लोकेशनवर त्यांचे घर आहे. प्रभासने २०१४ मध्ये हे घर बांधले होते जे कि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. प्रभासकडे अनेक आलिशान महागड्या गाड्या देखील आहेत.त्याच्याकडे रोल्स रॉयस आणि जग्वार आहे. त्यांच्या आलिशान वाहनांची किंमत सुमारे एक ते दोन कोटी रुपयांपासून सुरु होते.
प्रभासच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने २००२ मध्ये तेलुगू इंडस्ट्रीमधून सुरुवात केली. प्रभासकडे सध्या बिग बजेट चित्रपटांची रांग आहे. तो पूजा हेगडेसोबत राधे श्याममध्ये दिसला होता. आता तो सैफ अली खान आणि क्रिती सेननसोबत ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.