मुंबई – अनेकदा सेब्रिटींना आपल्या फॅन्समुळे अडचणींचा सामना करावा लागतो. याचाच प्रत्येय अभिनेत्री करीना कपूरला नुकताच आला. घरातून निघताना एकदम स्टाईलमध्ये निघालेल्या बेबोला विमानतळावर चाहत्यांनी अक्षरशः गराडा घातला. याबाबतचा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होतोय.
करीना कपूर खान नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यादरम्यान करीना कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यादरम्यान करीना कपूर एकटीच कारमधून खाली उतरून विमानतळावर जात होती. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेल्या तिच्या चाहत्यांनी तिला ओळखताच तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी केली.यासोबतच करीना कपूरचा एअरपोर्ट लूकही चर्चेत आहे. करीना कपूर एअरपोर्टवर सुंदर अशा ऑल व्हाइट लूकमध्ये दिसली.
View this post on Instagram
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान कोणीतरी करिनाचा हात खेचत आहे तर कोणी तिला मागे खेचत आहे. यादरम्यान करीना कपूरच्या खांद्यावरून तिची पर्सही सरकते. व्हिडीओमध्ये करीना सुद्धा खूप रागावलेली दिसत आहे आणि ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे.