पुरी – ओडिशातल्या पुरीतील भगवान जगन्नाथ यांच्या नावावर तब्बल 60,000 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या नोंदी असून या नोंदी ओडिशा सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच डिजिटल केल्या जातील, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
महाप्रभू जगन्नाथ यांच्या नावावर ओडिशामध्ये 60 हजार 426 एकर जमीन असून इतर सहा राज्यांमध्ये 395 एकर जमीन आहे, असे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक व्ही.व्ही. यादव यांनी व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीनंतर सांगितले.
ओडिशाच्या बाहेर, सर्वात मोठी जमीन पश्चिम बंगालमध्ये आहे. तिथे एकूण 322.930 एकर जमीन आहे तर 28.21 एकर जमीन महाराष्ट्रात, 25.11 एकर मध्य प्रदेशात, 17.02 एकर आंध्र प्रदेशात, 1.7 एकर छत्तीसगड मध्ये आणि 0.27 एकर बिहारमध्ये आहे.
यादव म्हणाले की, सरकारी ओडिशा स्पेस ऍप्लिकेशन सेंटरला जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्याचे काम दिले जाईल. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.