मुंबई – पूनम पांडे आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. आपल्या कामापेक्षा पूनम ट्रोलिंगमुळे जास्त चर्चेत असते. त्यामुळेच ती सतत प्रसिद्धीच्या झोतात राहते. नुकतच पूनम पांडेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रात्री उशिरा पार्टी करताना दिसत आहे. या व्हिडीओममधील पूनमची कृत्ये पाहून अनेक लोक तिच्यावर संतापले आहेत.
पूनम पांडेचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पूनम पबमध्ये बसून वेग वेगळ्या गोष्टींची मजा घेताना दिसत आहे.समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पूनम आनंदाने ग्रीस स्टाईलमध्ये अनेक प्लेट्सची तोडफोड करत आहे. एव्हडेच काय पण यावेळी पूनम एका काचेच्या नळीतून काहीतरी पिण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. नेटकऱ्यानी याला नशेचा पदार्थ म्हणत पूनमला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यानी मात्र पूनमला या व्हिडीओवरून तुफान ट्रोल केले आहे. अनेकांनी तिला डार्क सर्कल पडतील असे सॅले दिले आहेत तर काहींनी तिला थेट ‘दारुडी,बेवडी’ अशी उपमा सोशल मीडियावर दिली आहे. नुकतीच पूनम पांडे कंगना राणौतच्या रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये दिसली होती. या शोदरम्यान पूनम पांडेलाही अनेक वादांनी घेरले होते. पूनम पांडेने या शोच्या माध्यमातून तिची इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला होता.